वणी कृ.उ.बाजार समितीमार्फत सी.सी.आय.ची कापूस खरेदी सुरु

प्रथम शेतकरी तुराणकर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन कृ.उ-बा. समितीने केला सत्कार

0

जब्बार चीनी, वणी: वणीतील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत हंगाम २०२०-२१ करिता किमान आधारभूत दराने (हमी दर) गुरुवारपासून सी.सी.आय.ची कापूसखरेदी बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरु करण्यात आलेली आहे. यावेळी प्रथम शेतकरी कोना येथील सुनील रामचंद्र तुराणकार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या कापूस खरेदीचा आरंभ बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकार, उपसभापती पवन एकरे व सदस्य गणपत रासेकर, प्रमोद वासेकर, प्रमोद मिलमिले, सतीश बडघरे यांच्या हस्ते करण्यात आला.

शुभारंभाच्या दिवशी अंदाजे 5,000 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. त्यात ओलावा कमी असलेल्या कापसाला प्रति क्विंटल रुपये 5,825/ – हा भाव देण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकार, उपसभापती पवन एकरे व सदस्य गणपत रासेकर, प्रमोद वासेकर, प्रमोद मिलमिले, सतीश बडघरे,

सी.सी आय. वणीचे केंद्रप्रमुख अतुल जाधव, सी.सी.आय.चे कर्मचारी संजू बघेल, बाजार समितीचे सचिव अशोक झाडे, लेखापाल रमेश पुरी, कोषपाल अशोक घुगुल, सांख्यिकी प. ना. अहिरकर तथा कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

बाजार समितीतर्फे आवाहन

शेतकरी बांधवांनी आपला कापूस किमान आधारभूत दराने विक्रीकरिता आणत असताना सोबत वर्तमान सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत इत्यादी कागदपत्रे सोबत आणावीत. तसेच कापूस सुकवून विक्रीकरिता आणावा.

दिनांक २३/११/२०२० सोमवारपासून सर्व शेतकरी बंधुंनी फोनची वाट न पाहता त्यांच्या सोईनुसार वणी मुख्य आवार आणि शिंदोला उपबाजार आवार येथे कापूस विक्रीकरिता आणावा असे बाजार समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा

आज तालुक्यात 5 पॉजिटिव्ह

हेदेखील वाचा

एकाच दिवसातल्या दोन आत्महत्यांनी हादरले मारेगाव

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.