रस्ता नको; पण पूल आवर असे म्हणायची वेळ
३० किमीच्या रस्त्याच्या कामात ३८ पुलांचे होईल बांधकाम
सुशील ओझा, झरी: मुकुटबन पाटण ते बोरी राज्यमार्ग क्र ३१५ या मार्गावरील ३९/५०० ते ६९/००० पर्यंत सुधारणांचे काम सीआरएफ अंतर्गत सुरू आहे. सदर कामाचे टेंडर व्हॅल्यू ७२ कोटी ५३ लाख असून २९.५९ किलोमीटरचे काम पूर्ण करावयाचे आहे. ७२ कोटींच्या रस्त्याच्या कामात ८ लाख ५० हजार रुपयांचे ३८ पूल मंजूर आहे. तर कुठे जास्त दराचे पूलसुद्धा समाविष्ट आहे. मुकुटबन ते पाटण पर्यंत मंजूर पुलांपैकी १७ पुलांचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता नको पण पूल आवर असे म्हणायची वेळ आली आहे.
मुकुटबन, पाटण ते बोरी मुख्य मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु या मार्गावरील कामात ३८ पूलांचे बांधकाम मंजूर झाल्याची माहिती असून फक्त १५ किमीच्या मुकुटबन ते पाटणपर्यंतच्या अंतरात १७ पुलांचे काम सुरू असल्याने रस्त्याचे काम की पुलांचे काम सुरू आहे असा प्रश्न जनता करीत आहे. एका पुलाचे काम ८ लाख ५० हजारांचे असून ३८ पुलांच्या कामात कोट्यवधी खर्च केला जात आहे. उर्वरित पैशांत क्वॉलिटीचा रस्ता बनणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ज्या ठिकाणी रपटा, छोटे पूल किंवा मोठा उतार असलेल्या ठिकाणी जिथे पाणी साचून राहते अशा ठिकाणी पूल बांधणे आवश्यक असताना जिथे गड्डा, रपटा काहीच नसताना त्या जागीसुद्धा पुलाचे काम सुरू आहे. मुकुटबन ते मांगली ६ किमी अंतर असलेल्या मार्गावरील ५० मीटरच्या आत अनेक पुलांचे काम सुरू आहे. रोडच्या कामापेक्षा पुलांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिथे खालान जागा नाही अशा ठिकाणावर बांधलेल्या पुलाचे पाणी पावसाळ्यात साचून शेतात घुसून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्याच्या कामातील पुलांचे काम करणारे सर्वच ठेकेदार विविध राजकीय पक्षातील पुढारी दिसत आहे. तालुक्यातील पुलांचे किंवा रस्त्याचे काम फक्त राजकीय लोकांच्या पदरात पडत आहे. त्यामुळे इतर अधिकृत ठेकेदार कामाकरिता भटकत आहे. सर्व कामाची पाहणी किंवा चौकशी संंबंधित अधिकारी व अभियंता का करीत नाही ? ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी यांचे मधुर संबंध असल्यामुळे पुलाचे काम नित्कृष्ट होत असल्याची ओरड ऐकला मिळत आहे. तरी वरिष्ठ स्तरावरून चौकशी व पाहणी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा