प्रगती नगर झालं अधोगती नगर, रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे

पालिका प्रशासन सुस्त... जैन ले आऊट, प्रगती नगरच्या नागरिकांच्या तक्रारी

0

वणी: शहरातील प्रगती नगर, जैन लेआऊट या भागात सध्या पावसाच्या पाण्यानं जागोजागी डबके साचले आहे. सोबतच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्यानं नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणं कठीण झालं आहे. यासंबंधी जैन ले आऊट आणि प्रगती नगरच्या रहिवाशांनी तक्रार दिली आहे.

Podar School 2025

शहरातील प्रभाग क्र. 3 मधील पाण्याच्या टाकीजवळ घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. खुल्या भूखंडातील पाणी निघायला जागाच नसल्यानं त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसत आहे. परिणामी डासांची पैदास होऊन परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

श्रीराम पोटे यांच्या घराजवळ काळी चुरीचा ढिगारा आहे पण गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून तो रस्त्यावर टाकण्याकरीता पालिकेजवळ कामगार नाहीत. जैन ले आऊटच्या रस्त्यानं गाडी चालवितांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. जागोजागी खड्यांचं साम्राज्य आहे आणि त्यात पाणी साचलेलं आहे. या साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

याविरोधात प्रगती नगर आणि जैन लेआऊट परिसरातील रहिवाशांनी तक्रार दिली आहे. एकहाती सत्ता असल्यानं सत्ताधारी सत्तेत दंग राहून शहराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. या समस्येकडे लक्ष देऊन पालिकेनं रस्त्यांचा आणि खड्ड्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर, महेश चौधरी ,महेश पहापळे, राजू मांडवकर, प्रशांत बलकी तसंच परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.