अडेगावच्या रस्त्यांची दुरावस्था कायम

रस्त्याला आलं तलावाचं स्वरूप, वाहतुकीस अडथळा

0

देव येवले, मुकुटबन: झरी तालुक्यातील खडकी ते अडेगाव रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाने नेहमीच कानडोळा केला आहे. मात्र यंदा पावसाळ्याच्या दिवसात सदर मार्गाची अवस्था अधिकच बिकट झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या गावाच्या रस्त्याची समस्या जैसे थे आहे. डोलोमाईन्स ट्रकच्या ओवरलोड वाहतूकीमुळे रस्त्यात मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे जिकरीचे झाले आहे. दुचाकीस्वारांना तर अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.

विशेष म्हणजे अडेगाव हे गाव विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दत्तक घेतल्याचं घोषित केले आहे. पण ते फक्त नाममात्र आहे की काय असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहेत.

(हे पण वाचा: कुर्ली येथील आरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद)

सध्या पावसाळा सुरु असल्यानं पावसाने या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहतूकीचाही प्रश्न निर्माण होणार झाला आहे. याकडे संबंधित विभागाने त्वरीत लक्ष देवून या रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी, अशी मागणी अडेगाव ग्रामस्थांकडून होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.