रोहन पारखी यांची वणी विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्ती

स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसेना (शिंदे) लागली कामाला

विवेक तोटेवार, वणी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने संघटन मजबूत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या दिशेने वणी तालुक्यातील युवा नेतृत्व रोहन पारखी यांची वणी विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5 ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे झालेल्या पदग्रहण सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी वणीचे माजी आमदार व शिवसेना शिंदे गटाचे यवतमाळ-आर्णी विधानसभा समन्वयक विश्वास नांदेकर, तसेच तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

रोहन पारखी हे बजरंग दलाचे जिल्हा गोरक्षक असून त्यांची वणी तालुक्यात युवा नेतृत्व म्हणून ओळख आहे. शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांना लाभलेला आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांतही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed.