रोहपट येथे 300 वृक्षारोपण करून ले. कर्नल वासुदेव आवारी यांना हरीत श्रद्धांजली

वणीतील स्माईल फाउंडेशनचा अनोखा उपक्रम...

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीचे सुपुत्र शहीद लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ मारेगाव तालुक्यातील रोहपट येथे 300 वृक्षारोपण करण्यात आले. मंगळवारी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी 10 वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुहास नांदेकर तसेच डॉ. सचिन दुमोरे व प्रणाली दुमोरे तसेच टच फाउंडेशनचे डॉ. सॅमराज पोन्नुमणी यांची प्रमुख उपस्थिती होती. वणीतील सामाजिक संस्था स्माईल फाउंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Podar School 2025

गेल्या महिन्यात भारत व चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना वणीचे सुपुत्र ले. कर्नल वासुदेव आवारी यांचे निधन झाले होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व त्यांना हरित श्रद्धांजली देण्यासाठी स्माईल फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विविध प्रकारचे देशी झाडे उपस्थित मान्यवर व स्वयंसेवकांद्वारे लावण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ले. कर्नल वासुदेव आवारी हे परिसरातील तरुणांसाठी एक आदर्श होते. झाडांच्या माध्यमातून त्यांना वाहलेली ही श्रद्धांजली कायम तरुणांना प्रेरणा देणारी ठरणार, असे मनोगत डॉ. सचिन दुमोरे यांनी व्यक्त केले. तर लावलेले 300 रोपे हे कायम ले. कर्नल आवारी यांच्या स्मृतींना उजाळा देत राहणार व तरुणांना खंबीरपणे जगण्याचे बळ देत राहणार, असे मनोगत स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी व्यक्त केले.

यावेळी स्माईल फाउंडेशनचे उपाध्यक्ष पियुष आत्राम सचिव आदर्श दाढे, विश्‍वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, कुणाल आत्राम, महेश घोगरे, तन्मय कापसे, तुषार वैद्य, अनिकेत वासरीकर, दिनेश झट्टे, सचिन काळे, कृनिक मानकर, रोहित ओझा, तेजस नैताम, कार्तिक पिदूरकर, घनश्याम हेपट, आकाश राजूरकर, मनीष मिलमिले, मयूर भरटकर, राज भरटकर, सिद्धार्थ साठे, अतुल राठोड इत्यादी सदस्य व स्वयंसेवकांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा: 

Comments are closed.