बहुगुणी डेस्क, नागपूरः एस. पी. कंस्ट्रक्शन प्रस्तुत गुरूवंदनेत संगीतातील विविध संगीतकलांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले. अनहद डिजिटल स्टुडिओ व केशवानंद साउंडच्या सहकार्याने गायन, वादन आणि नृत्याचा अविष्कार विद्यार्थ्यांनी पेश केला. सुचेता महतपुरे साधनकर यांच्या विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रीय नृत्य तर सुमित महतपुरे यांच्या विद्यार्थ्यांनी तबला वादनाचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधाकर कोहळे यांनी केले. अध्यक्षस्थानी कलाध्यापक संघाचे अध्यक्ष नरेंद्र बारई होते. सोहळ्याला प्रभाग 33 चे नगरसेवक दीपक चौधरी, श्री गजानन महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विजय शहाकार, माजी नगरसेवक राजू नागुलवार, महेंद्र मोहेकर, प्रभाकर कोहळे, नीलेश चौधरी, दर्शन शनिवारे, दीपक गायकवाड व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले.
मेघ मल्हार रागातील डर लागे गरजे बदरिया, तोडा, तराणा, शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम गीतांची प्रस्तुती लक्ष्यती काजळकर, यश खेर यांनी केली. दृष्टी काजळकर यांनी काही शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्ये सादर केलीत.
तबल्याची साथ सुमित महतपुरे, ऑक्टोपॅडची साथ मंगेश सव्वाशेरे, कीबोर्डची साथ कौस्तुभ तांबूसकर, ढोलकीची साथ कुणाल दहेकर यांनी तर गिटारची साथ सुहास खोब्रागडे यांनी केली. ध्वनी व्यवस्था केशवानंद साउंडचे परिमल खोब्रागडे यांनी तर तांत्रिक व्यवस्था प्रज्ज्वल नासरे व मिलेश राजुरिया यांनी सांभाळली. रंजना साधनकर आणि नीलिमा महतपुरे यांचा यावेळी कृतज्ञता सत्कार झाला. गुरुवंदना सोहळ्याला कलारसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.