एस. टी. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा

राजू उंबरकर यांनी घेतली उपोषणकर्ते कर्मचाऱ्यांची भेट

जितेंद्र कोठारी, वणी: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या मुख्य मागणीने सुरू झालेले एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला मनसेनं पाठिंबा दर्शविला आहे. वणी आगारात सुरू असलेले एसटी कर्मचारी उपोषण मंडपाला सोमवार 2 ऑक्टो. रोजी मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी भेट देऊन संपाला पाठिंबा जाहीर केला आहे.

वाढीव महागाई भत्त्यांना मान्यता देत कृती समितीने आंदोलन मागे घेतले. मात्र विलीनीकरणच्या मागणीवर ठाम काही कामगार संघटना 1 टक्का घरभाडे वाढ व 28 टक्के महागाई भत्ता देण्याचे राज्य शासनाच्या निर्णयाशी सहमत नाही. वणी एसटी आगार अंतर्गत 245 चालक, वाहक कर्मचारी आहे. त्यातून तब्बल 70 कामगार 30 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून संपावर गेले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची मागणी योग्य असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, अमरावती जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील, धनंजय त्रिम्बके, आजीद शेख, शिवराज पेचे, लकी सोमकुंवर, मयूर घाडोडे, वैभव पुराणकर, संकेत पारखी, लोकेश लडके या मनसे कार्यकर्त्यांनी एसटी कामगार उपोषण मंडपाला भेट देऊन संपाला पाठिंबा जाहीर केला आहे.

ऑनलाईनपेक्षाही कमी दरात मोबाईल उपलब्ध

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.