Birthday ad 1

चोरलेली दुचाकी दुस-याच दिवशी चोरटे फिरवत होते ऐटीत, मात्र डाव फसला…

दुचाकी चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता

veda lounge

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात सध्या सातत्याने चोरीच्या घटना घडत आहे. त्यात सर्वाधिक घटना या दुचाकी चोरीच्या आहेत. मात्र या दुचाकी चोरीसंबंधी वणी पोलिसांना चांगले यश आले आहे. वडकी पोलिसांच्या मदतीने वणी पोलिसांनी तीन दुचाकी चोरांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून चोरीची दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या अनेक घटना समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सविस्तर वृत्त असे की वणीतील सदाशिव नगर येथून मंगळवारच्या मध्यरात्री एक मोपेड चोरीला गेली होती. दुस-या दिवशी बुधवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी चोरटे वडकी-राळेगाव रोडवर एक मोपेड घेऊन जाताना आढळून आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्यांनी तिघाही चोरट्यांची चौकशी केली. दरम्यान त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वडकी पोलिसांचा संशय बळावला. 

Jadhao Clinic

वडकी पोलिसांनी त्यांना पोलिसी ख्याक्या दाखवताच त्यांनी सदर दुचाकी ही सदाशिव नगर येथून चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरून वडकी पोलिसांनी वणी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. वणी पोलिसांनी तात्काळ वडकी पोलीस स्टेशन गाठत आरोपींना वणी पोलिसांच्या स्वाधीन केले, अशी माहिती वडकीचे ठाणेदार विनायक जाधव यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली. वणी पोलिसांनी गुरुदेव उर्फ सबळ गजानन राऊत (18) रा. मारेगाव, जय गजानन पाल (19), गौरव शंकर थेरे (19) दोघेही रा. मंगरूळ या तिघांवरही चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

चिखलगाव येथे दुचाकी चोरटा सीसीटीव्हीत कैद
गेल्या काही महिन्यांपासून वणी शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना समोर येत आहे. मात्र पोलिसांकडून अशा घटनांची तक्रार तर घेतली जाते मात्र त्याबाबत गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली जाते. चिखलगाव येथेही दोन दिवसांआधी एक दुचाकी चोरटा दुचाकी चोरण्याच्या प्रयत्न करताना सीसीटीव्हीत कैद झाला होता. दुचाकी चोरताना एक शेजारी जागा झाल्याने चोरट्यांचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. आता दुचाकी चोरटे ताब्यात आल्याने विविध दुचाकी चोरीच्या घटनांचा उलगडा होऊ शकतो.

सदर कार्यवाही एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रामकृष्ण महल्ले, एएसआय डोमाजी भादीकर पोलिस नायक हरिन्द्र कुमार भारती, सचिन मरकाम , विठ्ठल बुरुजवाडे, सागर सिडाम यांनी केली. पुढील तपास डोमाजी भादीकर करीत आहेत.

हे देखील वाचा: 

नवरात्रीनिमित्त सर्वात कमी दरात कर्ज उपलब्ध

प्रवाशांच्या खिशाला झळ, खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!