आषाढी एकादशीनिमित्त आयोजित काव्यसंमेलन उत्साहात संपन्न
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा उपक्रम
जितेंद्र कोठारी, वणी: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, विदर्भ विभाग द्वारा आषाढी एकादशीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कवीसंमेलन उत्साहात पार पडले. या कवी संमेलनाचा विषय “वारकरी शब्दांचे” हा ठेवण्यात आला होता. संमेलनामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व प्रतिभावंत कवी कवियित्रींनी उत्साहाने सहभाग घेतला होता.
संमेलनामध्ये उपस्थित सर्व कवी कवयित्री तथा विदर्भ विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या दर्जेदार कवितांचे भक्तीमय तथा बहारदार पद्धतीने सादरीकरण केले. वारकरी शब्दांची महिमा आपल्या कवितेतून सर्वांनी व्यक्त केली. काव्य संमेलनाचे उद्घाटन सतीश सोमकुवर यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाचे संमेलनाध्यक्ष संजय धांडे जिल्हाध्यक्ष वाशिम यांनी आपल्या सुमधुर गायनातून आषाढी एकादशीनिमित्त विचार व्यक्त केले.
या काव्य संमेलनाचे मार्गदर्शक परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे तसेच कवीसंमेलनाचे आयोजक विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे होते. या अद्वितीय संमेलनाचे प्रमुख अतिथीपद अमरावती विभागीय अध्यक्ष शिवा प्रधान यांनी भूषविले होते. या संपूर्ण काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन तथा तांत्रिक सहाय्य संदिप शेंडे यांनी केले. एकंदरीत सर्व कवी संमेलनाचा सोहळा अतिशय उत्साहाने व व्यवस्थितरित्या पार पडला.
हे देखील वाचा:
स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही त्यांच्या नशिबी नावेतूनच प्रवास