सेक्स रॅकेटच्या संशयावरून नागरिकांची धाड

साईनगरी परिसरात रात्री घडले नाट्य....

0

जितेंद्र कोठारी, वणी: साईनगरी येथील सेक्स रॅकेट चालत असल्याच्या संशयावरून नागरिकांनी  एका घरावर धाड टाकली. आज रात्री 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. यात नागरिकांनी एक तरुण व एक तरुणीला ताब्यात घेतले. तर याच घरात राहणारी आणखी एक तरुणी पळून गेली. दरम्यान नागरिकांनी तरुणाला चोप दिल्याचीही माहिती आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून साईनगरीतील शेवटच्या गल्लीत एक घऱ भाड्याने घेण्यात आले आहे. त्या घरात एक तरुण व एक तरुणी राहायला आले होते. मागील अनेक दिवसांपासून त्या घरात अनोळखी व्यक्तींचे सतत ये जा सुरु असल्यामुळे आजूबाजुच्या रहिवासीयांना संशय आला. घरात काही तरी गैरकृत्य होत असण्याबाबत स्थानिक रहिवाशांनी घर मालकाला सांगितले. मात्र घरमालकांनी पुरावे मागत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

शेवटी या प्रकाराला कंटाळून नागरिकांनी शुक्रवारी रात्री 8 वाजता दरम्यान त्या घरावर धाड टाकली. यात एक तरुण व दोन तरुणीला पकडून विचारपूस केली असता तरुणांनी लिव्ह इन मध्ये राहत असल्याचे सांगितले तर तरुणीनी आम्ही कसे ही राहो तुम्ही विचारपूस करणारं कोण? असे उलट उत्तर दिले. काही नागरिकांना तरुणाला चोप देतास त्यांनी सेक्स रॅकेट चालवीत असल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.

दरम्यान काही जणांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. तब्बल 40 मिनिटानंतर पोलीस साईनगरीत पोहचले. त्यावेळी साईनगरी कॉलनीतील तब्बल 60-70 महिला पुरुष जमा झाले होऊन त्या घरात पोहचले. मात्र याच दरम्यान घरातील एक तरुणी मागील गेट खोलून अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा यशस्वी झाली. पोलिसांनी त्या तरुणी कडून शनिवारी 10 वाजेपर्यंत घर खाली करून घेण्याची घरमालकाला तंबी दिली व तरुण व तरुणीला सोडून दिले. सदर तरुणी पुलगांव येथील तर मुलगा शास्त्रीनगर येथील असल्याची माहिती आहे.

‘वणी बहुगुणी’च्या वृत्तमालिकेमुळे बळ
गेल्या काही महिन्यांपासून शहरात सेक्स रॅकेटचा व्यवसाय वाढत आहे. याबाबत ‘वणी बहुगुणी’ची वृत्त मालिका देखील सुरू आहे. शहरातील दोन प्रतिष्ठीत व्यक्तींच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच ‘वणी बहुगुणी’ने याविषयी वृत्तमालिका सुरू केली आहे. यात शहरातील प्रमुख अड्डे, दलाल तसेच यांची मोडस ऑपरेंडी (कार्यप्रणाली) याविषयी पर्दाफाश केला होता. त्या वृत्तमालिकेमुळेच नागरिकांनी धाड टाकण्याचे बळ मिळाल्याची प्रतिक्रिया ‘वणी बहुगुणी’जवळ दिली. दरम्यान नागरिक धाड टाकत असताना पोलीस उदासिन भूमिका का घेत आहे हे एक न उलगडणारं कोडं आहे.

हे देखील वाचा:

आज शहरात कोरोनाचे 2 रुग्ण

ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघात, दोन जखमी

Leave A Reply

Your email address will not be published.