किराणा दुकानदारांकडून जादा दराने किराणा सामानाची विक्री
साखर, तेल, तूर डाळ, शेंगदाणा इ ची अधिक दराने विक्री सुरूच
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील किराणा दुकानदार जादा दराने विक्री करीत असल्याच्या तक्रारी सर्वसामान्य जनता करीत आहेत. शासनाने जनतेला त्रास होऊ नये याकरिता लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तूचे दुकाने उघडे ठेवण्याचे आदेश दिले. किराणा दुकान औषधी दुकान व भाजीपाला दुकान उघडे ठेवून जनतेचे त्रास कमी करण्याचा उद्देशाचा फायदा तालुक्यातील किराणा दुकानदार करीत असताना दिसत आहे. मात्र याकडे संबंधीत विभाग दुर्लक्ष करताना दिसत आहे.
लॉकडाऊन मुळे गोरगरीब रोजमजुर लोकांच्या हातातील कामे गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊन ठेपली आहे. अनेक गरीब कुटुंबियांना एक वेळचे किराणा समान भरून खाणे कठीण झाले आहे. अश्यातही काही निर्दयी दुकानदार किरणादार गरीब जनतेला लुटण्याचा गोरखधंदा सुरू केला असून याकडे अन्न औषध विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याची ओरड ऐकला मिळत आहे.
किराणा दुकानातून फल्ली तेल, सोयाबीन तेल, शेंगदाणे,साखर, तुरीची डाळ व इतरही वस्तू जास्त दराने विक्री करून जनतेची लूट करीत आहे. तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ मुकुटबन असून पाटण, मांगली, झरी, शिबला इथेही किराणा दुकाने असून सगळीकडे अशीच परिस्थिती असल्याने गोरगरीब जनतेचे मरणच आहे.
काही मोठ्या व्यापाऱ्यांनी कमी किमतीत आणनेला माल साठा करून आज जास्त दराने विकत असल्याची ओरड सुद्धा दुकांनदाराच्या चर्चेतून ऐकला मिळत आहे. किराणा दुकानदार जास्त पैसे घेत असल्यामुळे ग्राहकांना बिलसुद्धा देत नाही. ज्यामुळे कोणत्या वस्तूचे भाव किती हे सुद्धा माहीत पडत नाही.
अनेक ठिकाणी भावफलक नाही
तालुक्यातील बहुतांश किराणा दुकानात भावफलक लावलेले नाही. ग्राहकाने एवढे भाव कसे विचारले असता वरूनच भाव वाढले, किराणा सामानाची गाडी येत नसल्याचे सांगून जास्त दराने किराणा सामान विक्री सुरू आहे. अश्या प्रकारची लूट करणाऱ्या दुकांदारावर संमधीत विभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. तरी अश्या दुकानदारांची चौकशी करून दुकानाचे परवाने रद्दची कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
यापूर्वी तहसीलदार जोशी व नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी मुकूटबन पोलिस ठाण्यात मिटिंग घेऊन सर्व किराणा दुकानदाराना तंबी दिली होती परंतु त्यांच्याही आदेशाची पायमल्ली करून किराणा दुकानदार जास्त दराने विक्री करीत असल्याची ओरड ग्रामवासी करीत आहे.