संभाजी ब्रिगेडनी दिला रुग्णास मदतीचा हात

0

सुशील ओझा,झरी:- झरी तालुका संभाजी ब्रिगेडच्यावतीने मूत्रपिंड (किडनी) पीडीत रूग्ण गोपाल मांढरे यांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. अडेगावचे जेष्ठ नागरीक जनार्धन मोहितकार यांच्या हस्ते पिडीत रूग्ण गोपाल यांच्या वडीलाच्या हातात मदत स्वरुपात रोख रक्कम देण्यात आली. बुधवारी 6 जूनला त्यांच्या हाती ही रक्कम देण्यात आली.

पीड़ित रुग्ण गोपाल यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची असून तो शेळ्या राखून आपला उदार निर्वाह करायचा. मात्र नियतीने त्याच्यावर वेगळीच चाल केली. मुत्रपिंडाच्या विकारामुळे त्याचेवर सध्या सेवाग्राम येथे उपचार सुरु आहे. उपचारासाठी बराच मोठा खर्च आहे. अडेगाव येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन तीन दिवस गावतून वर्गनी गोळा करुण रुग्णास मदतीचा आर्थिक हात दिला.

यावेळी प्रशांत बोबडे, देव येवले, नितेश ठाकरे, संदीप आसुटकार, संजय आसुटकार, अशोक पानघाटे, केतन ठाकरे, दिनेश ठाकरे, राहुल हिवरकर, शंकर झाड़े, बंडू उरकुडे, दीपक हिरादेवे, रवि पींगे, गजानन मडावी हे उपस्थित होते. याकार्यासाठी विवेक सोनटक्के, छत्रपती काटकर, संजय पावड़े, विश्वास हिवरकार, विजय भेदुरकर, पुरुषोत्तम आसुटकार, संदीप येवले, शुभम राउत, दीपक पाल , सुमित क्षीरसागर, मंगेश झाडे, गजु झाडे, अक्षय गडकर, लकी कांबळे, अमोल गौरकार, पिंटू सहस्त्रबुधे, सागर पानघाटे, अमोल हिवरकार व गावातील इतर युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.