शेतकऱ्यांना पेरणीसाठी 10 हजार रुपये प्रती एकर अनुदान द्या

संभाजी ब्रिगेडच्यावतीने निवेदन सादर

0
ज्योतिबा पोटे,  वणी: लवकरच पेरणीला सुरूवात होणार आहे. मात्र सततच्या दुष्काळामुळे शेतक-याचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे शेतक-यांना पेरणीसाठी 10 हजार प्रति एकर अनुदान द्या या मागणीसह विविध मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड तर्फे करण्यात आली आहे. याबाबत सोमवारी उपविभागीय अधिका-यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की सततच्या नापिकीमुळे, दुष्काळ आणि शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुष्काळ निवारण्यासाठी शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवाव्या. चारा छावण्यांची संख्या वाढवावी, नागरिक व जनावरांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून द्याी. शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करावे. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे बिले माफ करावीत.
शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे सर्व शैक्षणिक सुविधा माफ करावे. शेतकऱ्यांना 2019-20 च्या या हंगामासाठी बिनव्याजी रु. २,००,०००/- कर्ज देण्यात यावे. शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये देण्यात यावे (तेलंगणा सरकारच्या निर्णयानुसार ) ७२,००० रिक्त जागेवर लावलेली बंदी उडवुन नोकरी भरती तात्काळ करण्यात यावी. अशा विविध मागण्यांचा यात समावेश आहेत.
आंदोलनाची दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेड मोठं आंदोलन पुकारेल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्हाध्यक्ष अजय धोबे, वणी तालुकाध्यक्ष विवेक ठाकरे, तालुकाकार्याध्यक्ष कपील रिंगोले, अमोल टोंगे, दत्ता डोहे, शेखर वर्हाटे, हेमंत गौरकार, प्रलय तेलतुंबडे, अभिजीत बलकी, शंकर निब्रड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.