वणीतील NBSA कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा

संविधानामुळेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय - यशवंत शितोळे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील एनबीएसए आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मध्ये भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राणानूर सिद्धिकी यांची तर मुख्य मार्गदर्शक म्हणून यशवंत शितोळे अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. रोहित वनकर ऍड. हुमेरा यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

संविधानामुळेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला आहे. मग ते शेतकरी, शेतमजूर किंवा शोषित, पिडीत, वंचित असो. आपण संविधानाचा अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन यशवंत शितोळे यांनी करत त्यांनी भारतीय संविधानातील विविध तरतुदीचे विवेचन करून त्याचे सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्व विशद केले. यावेळी त्यांनी करिअर कट्टाच्या माध्यमातून भारतीय संविधानाचे पारायण नियमितपणे घ्यावे असे ही मत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. राणानूर सिद्धिकी यांनी संविधानामुळेच प्रत्येक नागरिकांचे हक्क व कर्तव्य अबाधित आहेत. प्रत्येक नागरिकांनी हक्क व अधिकाराबाबत जागरुक असताना आपल्या कर्तव्य पालनाची जाणीव ठेवणे आवश्यक गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. गणेश शेडमाके यांनी केले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

4 दिवसानंतरही नरभक्षी वाघ मोकाटच…. नागरिक दहशतीत…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.