संविधान गौरव दिनानिमित्त कैलासनगर, राजूरमध्ये कार्यक्रम

संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि स्पर्धेचे आयोजन

0

कृपाशील तेलंग, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी तसंच माथोली ग्रामपंचायतीच्या वतीने माथोली आणि कैलासनगर इथं संविधान गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. माथोली ग्रामपंचायतीच्या वतीनं पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते.

रविवारी सकाळी माथोलीमध्ये संविधान या विषयावर वेकोलीचे सब एरिया मेनेजर वैरागडे, अनिल तेलंग, दशरथ पाटील बोबडे, आशिष मडावी यांचे भाषण झाले. यात सुमारे 150 लोक सहभागी झाले होते. यात संविधानाबाबात लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. भाषणानंतर उपस्थितांना मिठाई आणि अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं.

संध्याकाळी माथोली ग्रामपंचायतीत येणा-या कैलासनगर बुद्धविहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला बुद्ध वंदनेनं सुरुवात झाली. त्यानंतर संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करण्यात आलं. यावेळी उपस्थित वक्त्यांनी मार्गदर्शनपर भाषण केलं. पहिल्यांदाच ग्रामपंचायतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली देखील वाहण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायत सदस्य वैशाली पळवेकर, देवा पाचभाई, संदीप थूल, संगीता वानखेडे, तसंच मनोज वासेकर, कुमुद कांबळे, सुदर्शन तेलंग, लुंबिनी तेलंग, दिगंबर कांबळे यांच्यासह रुपेश ठाकरे सरपंच मूंगोली, प्रवीण पिंपळकर सरपंच गट ग्रामपंचायत, नारायन गुंजेकर उपसरपंच, आशीष मडावी युवा वर्ग, तसेच एकता, तेजस्विनी महीला मंडळ शिवभक्त युवा मंडळ, भारतिय बौध्द महासभाचे उपासक,उपासीका आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

राजूर कॉलरी येथे संविधान दिन उत्साहात साजरा
वणी तालूक्यातील राजूर कॉलरी येथेही संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दीक्षाभूमी बहुउद्देशीय संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी 9 वाजता संविधान दौडने या कार्यक्रमाची सुरूवात झाली. शहीद भगत सिंग चौक ते दीक्षाभूमी बुद्ध विहार पर्यंत ही दौड आयोजित करण्यात आली. तर दुपारी 2 वाजता रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.

संविधान दौडमध्ये सहभागी झालेले स्पर्धक

संध्याकाळी 7 वाजता जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यात ‘भारतीय संविधानाने सर्वहारा वर्गाला दिलेले अधिकार’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक वानखेडे होते तर प्रमुख मार्गदर्शक रवि डंभारे नागपूर, संचयता पाटील, नागपूर हे होते तर प्रमूख पाहूणे म्हणून संघदीप भगत, जि. प. सदस्या वृषाली खानझोडे, माजी उपसभापती वणी प.समिती, प्रविण खानझोडे, रवि सोनटक्के, दीपक पुडके हे होते. कार्यक्रमाच्या शेवटी दिवसभरात झालेल्या स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

संविधान विषयावर व्याख्यान देताना वक्ते
Leave A Reply

Your email address will not be published.