सर्वसामान्यांना माती मिश्रीत रेती तर चांगली रेती अधिक पैसे देणा-याच्या घशात

तालुक्यात रेती तस्करीला उधाण, अन्यथा उपोषण करणार....

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यात सध्या एकाच रेती घाटाचा लिलाव झाला आहे. त्यामुळे रेती तस्करी मोठया प्रमाणावर सुरू आहे. ऑनलाईन अर्ज करणा-यांना माती मिश्रीत रेतीचा पुरवठा केला जात असून चांगल्या दर्जाची रेती जास्त किमतीला विकली जात आहे असा आरोप करीत रेती तस्करी 10 दिवसात बंद करावी अन्यथा उपोषण केले जाईल असा इशारा ट्रॅक्टर मालक असोसिएशनद्वारे देण्यात आला आहे. याबाबत तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

Podar School 2025

स्वस्त दरात घराच्या बांधकामासाठी रेती मिळणार असल्याने बांधकामाच्या खर्चात बचत होईल अशी आशा सर्वसामान्यांना होती. यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागत होते. मात्र ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांना माती मिश्रीत रेती पाठविण्यात येत आहे. तर चांगल्या दर्जाची रेती ही जास्त किमतीने विकली जात आहे. हा ऑनलाईनचा प्रयोग रेती तस्करांना जगविण्यासाठी आहे. शहरात व शहराबाहेर रेतीचे अवैध रेतीचे साठे पहावयास मिळत आहे व अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप ट्रॅक्टर मालक संघटनेने केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रेती डेपोमध्ये साठवणूक करण्याच्या नावावर दिवसरात्र उपसा केला जात आहे. एका रेतीचा ऑर्डरमागे चार वाहने भरून पाठविल्या जात आहे. शासनाचा यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. सोबतच ट्रॅक्टर मालक व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. जर 10 दिवसात ही रेती तस्करी बंद न झाल्यास ट्रॅक्टर मालक हे तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी ट्रॅक्टर मालक कल्याणकारी असोसिएशनचे धर्मेंद्र काकडे, सुमित ठेंगणे, प्रेमानंद धानोरकर, प्रमोद ताजने, प्रमोद बोबडे, शिवशंकर काटकर, बंडू निंदेकर, राजू चिडे, प्रमोद मिलमिले, गणेश बदकल, मनोज मिलमिले उपस्थित होते.

Comments are closed.