सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार अमोल बारापत्रे यांची नुकतीच बदली करण्यात आली. त्यांच्या जागी ठाणेदार म्हणून पांढरकवडा येथील सहायक पोलिस निरीक्षक संगीता हेलोंडे यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. पाटण स्टेशन अंतर्गत चालणा-या अवैध धंद्यांमुळे त्यांची बदली झाल्याचे बोलले जात आहे.
संगीता हेलोंडे यांची एक डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख आहे. यापूर्वी वणी इथे त्या कार्यरत होत्या. तिथे त्यांनी आपल्या कामाची एक वेगळी छाप सोडली. तर पांढरकवडा इथे लॉकडाऊन काळात केलेले कार्य कौतुकास पात्र ठरले होते. संचारबंदीत विनाकारण फिरणा-या लोकांवर केलेल्या कारवाईमुळे त्यांची पांढरकवडा येथे चांगलीच दहशत निर्माण झाली होती. गाडीचा आवाज ऐकताच बिनकामाने फिरणारे लोक पसार व्हायचे.
रोड रोमियोंचा देखील त्यांना चांगलाच बंदोबस्त केला. अनेक रोडरोमियोंना धडा शिकवल्याने तेथील चिडीमारीत मोठ्या प्रमाणात कमतरता आली. याशिवाय लॉकडाऊन काळात लॉकडाऊन काळात त्यांनी रुग्ण तसेच गोरगरीबांना ही मदत केली होती. यासह अवैध धंदे, महिलांवरील अत्याचार, गुंडगिरी, चिडीमारी इत्यादींवर त्यांनी चांगलाच वचक बसवला आहे.
पाटण, झरी, माथार्जुन व शिबला येथे पट्टी फाडून तसेच मोबाईल द्वारे आकडे घेऊन मटका जुगाराचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू होता. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत एलसीबीचे झरी, शिबला व माथार्जुन येथील आठ मटका बहाद्दरांना अटक करून कार्यवाही केली तर पाटण येथील ठाणेदारांची तडकाफडकी बदली करण्यात आली. आता पाटण ठाण्याचा प्रभार संगिता हेलोंडे यांच्याकडे आल्याने त्या परिसरात चालणारे अवैध धंदे, गोवंश तस्करी, दारू तस्करी इत्यादी बाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हे देखील वाचा:
विठ्ठलवाडीतील कु. अनघा विजय दोडके झळकली शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत