साक्षी बनणार इंजिनियर.. संजय खाडे यांचा मदतीचा हात

प्रवेश थांबलेल्या विद्यार्थीनीला शिक्षणासाठी आर्थिक मदत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: साक्षी ही गरीब कुटुंबातून आली. मात्र अभ्यासात ती हुषार होती. नुकतीच ती 12 वी झाली. तिला इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला. मात्र आर्थिक समस्येमुळे तिचा प्रवेश थांबला होता. अखेर साक्षीच्या शिक्षणासाठी संजय खाडे यांनी मदतीचा हात पुढे केला आणि साक्षीच्या चेह-यावर हास्य फुलले. संजय खाडे यांनी केलेल्या मदतीमुळे साक्षीचे शिक्षण सुरू होणार आहे.

कु. साक्षी रंगुरवार असे विद्यार्थीनीचे नाव आहे. ती वणीतील जैताई नगर येथील रहिवासी आहे. ती आपले आई-वडील व एका मोठ्या भावासोबत राहते. साक्षीच्या घरची परिस्थिती हालाकीची आहे. तिची आई मेसचे डबे पोहोचवण्याचे काम करते तर तिचे वडील हमाली करतात. साक्षी ही अभ्यासात हुषार असून तिने दहावी व बारावीत चांगले गुण मिळवले. ती सीईटी परीक्षेत पात्र ठरली. तिला अमरावतील येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळाला आहे.

घरची परिस्थिती हालाकीची असल्याने साक्षीचा महाविद्यालयातील प्रवेश थांबला होता. ही बाब रंगनाथ स्वामी अर्बन निधी चे अध्यक्ष व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांना कळली. त्यांनी साक्षीला घरी बोलवून तिला 20 हजार रुपयांची शैक्षणिक मदत केली. यावेळी संजय खाडे आणि त्यांच्या पत्नी संगीता खाडे यांनी साक्षीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अनिलकुमार टोंगे, नामदेवराव जेनेकर, प्रा. धनंजय आंबटकर, प्रा. बाळकृष्ण राजूरकर, गजेंद्र भोयर, नारायण मांडवकर, पांडुरंग पंडिले, अशोक चौधरी, शशिकांत नक्षणे, सुरेश मांडवर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संजय खाडे यांच्या मदतीचे परिसरात कौतुक होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.