संत रविदास महाराज मंदिर पाडल्याचा वणीत निषेध
संत रविदास महाराज चर्मकार युवामंचाने दिले निवेदन
बहुगुणी डेस्क, वणी: तुघलकाबाद, दिल्ली येथील संत रविदास महाराज यांचे मंदिर सरकारने पाडले. या घटनेचा निषेध संत रविदास महाराज चर्मकार युवामंचाने केला. त्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन दिले. बादशाह सिकंदर लोधी पासून अनेकांच्या गुरुस्थानी संत रविदास होते.
सिकंदर लोधीने गुरुदक्षिणा म्हणून संत रविदास यांच्या स्मारकासाठी जागा दिली. 1947- 48 पासून सदर जागा व मंदिर नावे महसूल खाते सातबारा नोंद आहे .1958-59 मध्ये या मंदिराचे जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण तत्कालीन उपप्रधानमंत्री जगजीवनराम यांनी केल्याची नोंद आहे. 10 ऑगस्ट 2019 रोजी हे सहाशे वर्षे जुने मंदिर शासनाने उद्ध्वस्त केल्याने संत रविदास यांच्या अनुयायांमध्ये संतापाची लाट आहे.
27 करोड चर्मकार बांधव आणिअनुयायी हे मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी करीत आहेत. अशा आशयाचे निवेदन सादर केले. यावेळी रवी धुळे, राजकुमार खोले, हेमंत वाघमारे, योगेश सोनोने, किशोर हांडे, श्याम गिरडकर, युवराज वाडेकर, आशीष डुबे. किसन कोरडे, महेश लिपटे, मंगेश सोनोने, प्रदीप गवळी, संदीप वाघमारे, रवी डुबे, अमोल बांगडे, रोशन गिरडकर, प्रवीण खानझोडे, विजयराज सेवेकर, राजू वाघमारे, सुबोध बांगडे, ज्योती येरेकर, दिलीप भोयर भारत लिपटे उपस्थित होते.