बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भ तेली समाज महासंघ वणी तालुक्याच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची जयंती स्थानिक जगनाडे चौकात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हा सचिव रवी बेलूरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार आणि नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे हे उपस्थित होते.
सर्वप्रथम संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून समाजबांधवांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कासावार यांनी संताजींच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी संकलन करून लिहिलेल्या तुकाराम महाराजांच्या साहित्याविषयी माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात बेलूरकर यांनी संताजी जगनाडे महाराज हे समाजासाठी दीपस्तंभ असल्याचे म्हटले. त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्याचे आवाहन केले. याप्रसंगी नगरसेवक प्रशांत निमकर, राकेश बुग्गेवार, रवींद्र लिचोडे, माजी न.प. उपाध्यक्ष विनोद निमकर, पौर्णिमा शिरभाते, अक्षदा चव्हाण, भारती तलसे,
शरद तराळे, सचिन हजारे, राजू येनुरकर, नीलेश डवरे, पंढरीनाथ बोरपे, गजेंद्र भटघरे, वसंत तलसे, विनायक दांडेकर, श्रीरंग गिरटकर, सुनील बडघरे, अजित बडघरे, राहुल दांडेकर, वाघ, गोपाल पाटील, कैलास पिपराडे, गजानन पाटील, पंकज कासावार, अमित लिचोडे, आशीष डंभारे, रमेश पाटील, गणेश पडोळे,
मारोती शिखरे, मनीष शेरजे, दीपक पाऊणकर, नयन डंभारे, प्रीतम म्हाकारकर, श्रेयश हरणे, अमित उपाते, संकेत गंधारे, गोपाल पाटील इत्यादी समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार या कार्यक्रमाचे आयोजक विदर्भ तेली महासंघाचे वणी तालुका अध्यक्ष संतोष डंभारे यांनी केले.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
[…] संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी […]