सराठी ते बोटोणी रस्त्याची दुरवस्था

पावसाळ्यामुळे लोकांंना ये-जा करण्यासाठी त्रास

0 360

जयप्रकाश वनकर, बोटोणी: प्रधान मंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत गाव तेथे रस्ता, या उपक्रमांतर्गत प्रत्येक गाव मुख्य प्रवाहत यावे. ग्रामीण भागाचा विकास व्हावा. त्याच बरोबर ग्रामीण जनतेला शहरांशी जोडून त्यांना सर्व सेवा मिळण्यात याव्या या हेतूने ग्रामीण भागातील रस्ते निर्मिती करण्यात येत आहे. मात्र हे रस्ते तयार झाल्यानंतर त्या रस्त्याची आजची अवस्था पाहता परिस्थिती काही वेगळेस सांगत असल्याचे चित्र आज पहावयास मिळते आहे.

सराठी ते बोटोनी रस्त्याची झालेली असून बोटोनी वरून पश्चिमेस ५ किमी असलेला डांबरी रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्या उखडल्याने मोठी गिट्टी बाहेर निघाली असून त्या जागी मोठे खड्डे असल्याने या भागातील जनतेला ये जा करत असताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत. रस्ता हा जंगल व्याप्त असून वन्य प्राण्यांचा सुद्धा या रत्यावर वावर असते. पावसाळा सुरु झाला असून पावसाळ्यात रस्त्याचा वा खड्ड्यांचा वेध घेणे कठीण झाले आहे.

रात्री अपरात्री काही ना काही कामानिमित्त रस्त्यांनी लोकांची ये जा असते. शालेय विध्यार्थी, शेतकरी तसेच वैद्यकीय सेवा घेण्यासाठी जाणार्यांना या रस्त्यांनी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तेव्हा सदर रस्ता हा दुरुस्त करून देण्यात यावा अशी मागणी गावातील लोकांनी केली आहे.

सदर रस्ता हा नियमित ये जा करण्याचा असल्याने त्या रस्त्याने उखडलेली गिट्टी, मोठे खड्डे त्यामुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. दुचाकीस्वारांच्या मनक्याचा आजाराचे प्रमाण वाढले असून, पायदळ चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे सदर
रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे,अन्यथा जनतेला घेऊन रस्त्यावर उतरू – दयानंद कुळमेथे, अध्यक्ष आदिवासी सेल मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी

Comments
Loading...