संभाजी ब्रिगेड पक्षाचा सौरभ खेडेकरांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा २६ मे रोजी

0

ब्युरो, मारेगाव: संभाजी ब्रिगेड, जिल्हा यवतमाळ (पूर्व)च्या  वतीने कार्यकर्ता मेळावा शनिवार, दि.२६ मे २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता, स्थानिक वसंत जिनिंग हॉल  येथे आयोजित करण्यात येत आहे.

 

Podar School 2025

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख आहेत. प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर कार्यकर्त्यांना आजच्या राजकिय घडामोडीवर मार्गदर्शन करतील. या मेळाव्याला वणी-मारेगाव-झरी-पांढरकवडा तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहतील असा अंदाज आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहता तरुन वर्गाला प्रस्थापित राजकिय पक्षातील नेत्यानी निवणुकीत मते घेन्यासाठी वापर केला त्याबदल्यात त्यांना दारु सारखे वाईट व्यसन लाऊन बेरोजगार बनविले मात्र संभाजी ब्रिगेड विचाराचा कार्यकर्ता घडवित आहे आज संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते व्यवसायात यशस्वी होत आहे ,आता संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यासाठी रस्त्यावर येऊन मोठी लढाई लढन्याचा पक्षाचा अजेंडा असुन शेतमालाला हमी भाव व दारु मुक्त गाव हा संदेश गावोगावी पोहचविन्यासाठी गेल्या एक महिन्यापासून स्वराज्य संकल्प अभियान वणी विधानसभा क्षेत्रात जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांच्या नेतृत्वाखाली राबविन्यात आले.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रस्तुत कार्यकर्ता मेळावा यशस्वी व्हावा यासाठी  यवतमाळ जिल्हाध्यक्ष अजय धोबे, वणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष इंजि.अनंत मांडवकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश कोल्हे, मारेगाव तालुकाध्यक्ष कुंदन पारखी, झरी तालुकाध्यक्ष प्रशांत बोबडे, पांढरकवडा तालुकाध्यक्ष गंगाधर पखाले, विवेक ठाकरे, अॅड. अमोल टोंगे, अभय पानघाटे, शंकर निब्रड, दत्ता डोहे, दत्ता बोबडे, प्रमोद लडके, अमोल कळसकर, राहुल घागी, देव येवले, नितेश ठाकरे, राहुल जोगदंड, वसिम शेख, इरफान खान, अमोल चरडे, अॅड. स्वाती भोसकर इत्यादिंनी उपस्थित राहन्याचे आवाहन एका पत्रकातून केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.