पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 4 येथे शनिवारी, दि. 26 जुलै 2025 रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली. समितीच्या कार्यकाळ संपल्याने नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाली. तेजराव कांबळे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी आणि रजनी दीपक राठोड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सभेत पालकांनी मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी सूचना मांडल्या. मुख्याध्यापिका वंदना किशोर परसावार यांनी त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या विकासासाठी नियोजनाचा ध्यास त्यांनी व्यक्त केला. सभेचे संचालन जयप्रकाश सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवींद्र तोंडे यांनी केले. शिक्षणतज्ज्ञ मनोहर वरारकर आणि विधिज्ज्ञ किशोर परसावार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक विनोदराव चव्हाण, प्रभाकर ब्रह्मटे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.

Comments are closed.