वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष पथकाद्वारे सर्च ऑपरेशन सुरू

वेकोलिच्या खाणीत झालेल्या हल्ल्यानंतर कर्मचारी दहशतीत

जितेंद्र कोठारी, वणी: 27 डिसेंबर रोजी निलजई कोळसा खाणीत (ओपन कास्ट) ऑन ड्युटी असलेल्या एका कर्मचा-यावर वाघाने हल्ला केला होता. या हल्ल्यात कर्मचारी जखमी झाले होते. वाघाने थेट खाण परिसरात एन्ट्री केल्याने कर्मचारी चांगलेच दहशतीत आले आहे. आता या हल्ला करणा-या वाघाला जेरबंद करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी अमरावती येथील वनविभागाची एक विशेष टीम वणीत दाखल झाली आहे.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वणी तालुक्यात वाघाची दहशत सुरू आहे. आधी भुरकी येथील एका तरुण शेतक-यांवर हल्ला करून वाघाने ठार केले होते. त्यानंतर निळापूर येथील एक कामगार वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला होता. परिसरात अनेकांना वाघाचे दर्शन झाले आहे. वणीच्या वेशीवर असलेल्या कॉलोनीत देखील वाघाने प्रवेश केला. दरम्यान कोलेरा शिवारात वाघाने एका शेतक-याचा फडशा पाडला. तेव्हापासून वनविभाग वाघाच्या मागावर होते. अखेर कोलारपिंपरी परिसरात वाघालाा जेरबंद करण्यात आले होते.

मात्र कोलारपिंपर परिसरात वाघ जेरबंद झाल्याचा परिसरातील नागरिकांचा आनंद अल्पकाळ टिकला. वाघ जेरबंद झाल्याच्या दोन दिवसांनीच कोलेरा परिसरात वाघाने एका पशूधनावर हल्ला केला होता. त्यानंतर 27 डिसेंबरच्या संध्याकाळी एका वाघाने निलजई खाणतील वेकोलिच्या कर्मचा-यावर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कर्मचा-याचा जीव गेला नाही. मात्र पुढील अनर्थ टाळण्यासाठी वन विभाग कामाला लागले आहे.

निलजई कोळसा खाणीत झालेल्या वाघाच्या हल्ल्यानंतर वनविभागाचे एक पथक वाघाचा शोध घेत आहे. दरम्यान तातडीने वाघाला जेरबंद करण्यासाठी अमरावती येथून एक विशेष टीम परिसरात दाखल झाली आहे. ही टीम गेल्या दोन दिवसांपासून कोलारपिंपरी परिसरात सर्च ऑपरेशन करीत आहे. वाघाच्या हालचाली टीपण्यासाठी परिसरात 35 ते 40 कॅमेरे लावल्याची माहिती आहे. या हालचालीवरून वाघाला तात्काळ जेरबंद केले जाणार आहे. 

आणखी किती दिवस राहणार दहशत?
वणी तालुक्याच्या सभोवतालच वाघांचा वेढा असल्याचे सांगितले जाते. या वाघांकडून अनेकदा पशूधनावर हल्ला करण्यात आला आहे. कोलेरा येथील शेतक-याच्या मृत्यूनंतर तब्बल दोन आठवडे वाघाला जेरबंद करण्यासाठी लागले होते. आता निलजई खाणीत शिरलेल्या वाघाला जेरबंद करण्यास किती दिवस लागेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दीपक टॉकीज चौपाटी परिसर बनला मटका पट्टीचा अड्डा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.