ज्येष्ठ पत्रकार अण्णाजी कचाटे यांचे निधन

मारेगाव तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातील 'गुरुजी' काळाच्या पडद्याआड

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तथा सेवा निवृत्त शिक्षक अण्णाजी पंढरीनाथ कचाटे (73) यांचे आज 11 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सकाळी 7.30 वाजता मेघे सावंगी (वर्धा) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून त्यांच्यावर सावंगी येथे उपचार सुरू होता. त्यांची मारेगाव तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातील पहिल्या पिढीतील पत्रकार म्हणून ओळख होती. तालुक्यातील पत्रकारांमध्ये ते ‘गुरुजी’ या नावाने ओळखले जायचे.

अण्णाजी कचाटे हे तालुक्यातील कुंभा येथील रहिवासी होते. ते भारत विद्या मंदिर कुंभा येथे शिक्षक या पदावरून सेवा निवृत्त झाले. त्यांना किडनीचा आजार असल्याने ते नेहमी उपचारासाठी चंद्रपूर येथे जात होते. त्यामुळे ते काही दिवसांपासून वणी येथील त्यांच्या मुलाकडे राहत होते. दरम्यान गेल्या आठवड्यात त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. दरम्यान सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या गेल्या 30/35 वर्षा पासून शिक्षक असतानाच त्यांनी बातमीदार म्हणून पत्रकारितेला सुरूवात केली. परिसरातील अनेक विषय त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून उचलले. तालुक्यातील अनेक कोलाम पोड वस्तीच्या समस्या त्यांनी आपल्या लेखनीतून मांडल्या व मार्गी ही लावल्या. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा वावर होता. कुंभा येथे त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय चालू केले होते.

नवीन पत्रकारांनाही ते कायम मार्गदर्शन करायचे. तालुक्यातील ग्रामीण पत्रकार संघटनेचे ते सल्लागारही होते. अण्णाजी यांच्या मागे पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा मोठा आप्तपरिवार आहे. पत्रकार क्षेत्रातील जेष्ठ व निर्भीड पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ‘वणी बहुगुणी’तर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली.

हे देखील वाचा:

गेल्या तीन दिवसात 418 रुग्णांची कोरोनावर मात

कोरोना रुग्णासंख्येच्या स्फोटनंतर आज मारेगाव तालुक्याला दिलासा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.