भांदेवाडा येथे तीनपत्ती जुगार खेळताना सात जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : मागील काही दिवसांपासून वणी पोलिसांनी मटका, जुगार व अवैध धंद्याविरुद्ध मोर्चा उघडला आहे. आगामी पोळा सण व बडग्याच्या निमित्ताने ग्रामीण भागात जुगाराला उत आले आहे. त्यामुळे पोलीस विभागाने अवैध धंद्याची माहिती देणाऱ्या आपल्या खबऱ्यांना अक्टिव केले आहे. वणी तालुक्यातील भांदेवाडा येथे शनिवार 9 सप्टे. रोजी पोलिसांनी धाड टाकून कट पत्ता जुगार खेळत असताना 7 जुगाऱ्यांना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपींकडून  पोलिसांनी 54 हजार 420 रुपये जप्त केले.

वणीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना भांदेवाडा येथे सार्वजनिक जागेवर जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या अनुषंगाने सहा. पो.नि. माधव शिंदे यांनी दुपारी 3.30 वा. दरम्यान  स्टाफसह भांदेवाडा वेकोली येथे जाऊन जिल्हा परिषद उ. प्राथ. शाळेच्या मागे एका टिनाच्या शेडच्या आडोश्यात पैशाची बाजी लावून हारजीतचा कट पत्ता नावाचा जुगार खेळताना 7 जणांना अटक केली.  यावेळी राहुल नानाजी गोरे (29), नामदेव अर्जुन आत्राम (54), मिलिंद वसंता डंभारे (45), सूर्यभान रमेश देवाळकर (26), शंकर यादव खापणे (45), चंद्रभान रमेश देवाळकर (30) सर्व रा. भांदेवाडा ता. वणी व पवन शेषराव बरडे (25) रा. निम्बाला यांचे कडून पोलिसांनी अंगझडतीमध्ये 54 हजार 420 रुपये रोख व ताश पत्ते किमत 50 रुपये असे एकूण 54 हजार 470 रुपयांचा मुदेमाल जप्त केला.

सदर कार्यवाही जि.पो. अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पो. अ. पियुष जगताप, उप. वि. पो. अ. गणेश किंद्रे यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माधव शिंदे, स.फौ. सुदर्शन वानोळे, पो.ना. हरीन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, पो.कॉ. विशाल गेडाम, गजानन कुडमेथे यांनी केली.   

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.