जितेंद्र कोठारी, वणी: शहरात सुरु सेक्स रॅकेटबाबत वणी बहुगुणीने वृत्त मालिका सुरू केली आहे. याद्वारे सोशल मीडियाचा उपयोग करून सेक्स रॅकेट चालणारी कार्यप्रणाली (मॉडस ऑपरेंडी) सुद्दा उघड करण्यात आली आहे. समाजात प्रतिष्ठा असणा-यांसह, अनेक उच्चभ्रू लोक यात अडकल्याची माहिती आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी व शहराचे सामाजिक स्वास्थ शाबुत ठेवावे यासाठी शिवसेनेतर्फे ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.
सेक्स रॅकेटच्या व्यवसायात महिला आणि पुरुष असे दोघेही आघाडीवर आहेत. हा व्यवसाय इतका मोठा आहे की आंबटशौकिनांची हौस फिटवण्यासाठी बाहेरगावाहूनही कॉलगर्ल पुरवली जाते. याशिवाय सेक्स रॅकेटमध्ये काम करणाऱ्या तरुणींसाठी वणी व भालर येथील दलाल ग्राहक शोधण्याचे कार्य करीत असल्याची माहिती आहे. त्यात वणी येथील दलालाची याआधी चौकशी झाल्याचे बोलले जात आहे.
लॉकडाऊन काळात रंगेल महाशयाच्या घरी धाड?
दोन व्यक्तींच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. कॉलगर्लचे शौकिन असलेले हे महाभाग घरी राजरोसपणे कॉलगर्ल बोलवायचे. केवळ घरच नाही तर प्रसंगी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणीही त्यांनी कॉलगर्ल बोलवल्याचे ऑडिओ क्लिपमधून निष्पन्न होत आहे. या रंगेल महाशयांवर पोलिसांचा आधीपासूनच संशय होता. 10 ते 11 महिने आधी यातील एका महाभागाने घरी कॉलगर्ल बोलविल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांच्या घरावर धाड टाकली होती. मात्र त्यात तो थोडक्यात बचावला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
शिवसेनतर्फे ठाणेदारास निवेदन
वणी शहरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर ‘वणी बहुगुणी’ने वृत्त मालिका सुरू केली आहे. या वृत्तमालिकेची दखल घेऊन वणी शहरात सुरू अश्या गैरकृत्यांबाबत सखोल चौकशी करावी व यात जे दोषी आढळून येणार त्यांच्यावर कठोर शासन करावे अशी मागणीही निवेदनातून ठाणेदार वैभव जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाला कितपत गांभीर्याने घेऊन चौकशी करणार? याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
हे देखील वाचा: