हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीस अटक

वणीतील सुभाषचंद्र बोस चौकातील घटना

0

जब्बार चीनी, वणी: शहरातील सुभाषचंद्र बोस चौकात बुधवार 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास तलवार घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीस वणी पोलिसांनी अटक केली. शुल्लक वादातून त्याने तलवार काढल्याची माहिती आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता वणीच्या न्यायालयातून आरोपीला जामीन मिळाला आहे.

बुधवार 17 फेब्रुवारी रोजी शेजाऱ्यासोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद काही वेळाने विकोपाला गेला यामध्ये प्रवीण मधुकर कार्लेकर (43) रा. सुभाषचंद्र बोस चौक वणी याने तलवार काढली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत प्रवीणला ताब्यात घेतले.

आरोपीवर कलम 269, आर्म्स ऍक्ट 4 (25) नुसार गुन्हा नोंद केला आहे. बुधवारी त्याला वणीच्या न्यायालयात हजर केले होते. यावेळी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

सेक्स रॅकेट व्यवसायाला ‘ब्लॅकमेलिंग”चा जोडधंदा (भाग 4)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपचे निषेध आंदोलन

Leave A Reply

Your email address will not be published.