लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून वणी येथील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. ऐनवेळी मात्र तिला लग्नास नकार देण्यात आला. ही घटना वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

सुशांत सुभाष भटघरे (30) रा. गाडगे बाबा चौक, वणी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी व सुशांत यांची फेब्रुवारी 2023 मध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर त्यांच्यात संवाद वाढला. अशात दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. या काळात सुशांतने पीडित तरुणीचा विश्वास संपादन करीत लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतरही त्याने अनेकदा पीडित तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडित तरुणीने सुशांतला लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, तो टाळाटाळ करू लागला. तरुणीने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला असता सुशांतने पीडित तरुणीला स्पष्ट शब्दात लग्नास नकार दिला व जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

विश्वासघात झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणीने शनिवार 14 ऑक्टो. रोजी वणी पोलीस ठाण्यात प्रियकर सुशांत भटघरे रा. गाडगेबाबा चौक  विरुद्द बलात्कार, जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 376 (2)(N), 417, 506 व अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत  गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व पोलीस निरीक्षक अजित जाधव करीत आहे.

Comments are closed.