वणी तालुक्यात ठिकठिकाणी छ. शाहू महाराज जयंती साजरी

संत रविदास सभागृह, गणेशपूर, छ. शाहू महाराज शाळेत अभिवादनपर कार्यक्रम

0

विवेक तोटेवार, वणी: शनिवार दिनांक 26 जून रोजी तालुक्यात ठिकठिकाणी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात मात्र कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली. वणी येथे चर्मकार समाजातर्फे, गणेशपूर येथे छत्रपती महोत्सव समितीतर्फे तर वणीतील राजश्री शाहू महाराज हिन्दी शाळेमध्येही जयंती साजरी करण्यात आली. या व्यतिरिक्त तालुक्यातील अनेक गावांमध्येही छत्रपती शाहू महाराज यांच्या तैलचित्राला हार टाकून अभिवादन करण्यात आले.

संत रविदास महाराज युवा मंच, वणी व राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत रविदास सभागृह वणी येथे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वणी विभागीय अध्यक्ष रवी धुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी रवी धुळे व किशन कोरडे यांनी अभिवादनपर विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष अमोल बांगडे, किशोर हांडे, पंकज वादेकर, श्याम गिरडकर यांच्यासह मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधव उपस्थित होते.

वणीतील छत्रपती शाहू महाराज हिन्ही शाळेत जयंतीनिमीत्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शुभांगी चोपणे होत्या. कार्यक्रमाचे संचालन अनिता टोंगे यांनी तर आभार सुनिल गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.

गणेशपूर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून छत्रपती शाहू महाराज यांचा जयघोष करण्यात आला. यावेळी छत्रपती महोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश काकडे, समितीचे मार्गदर्शक सुभाष वैद्य, समितीचे उपाध्यक्ष विवेक ठाकरे, समितीचे सचिव गजानन चंदावार, संदेश भोयर, प्रशांत काळे, हरीश घाटे, मनोज गादेवार, माणिक गजबे, संदीप झिले, सतीश कांबळे, मुरलीधर बल्की, सूर्यभान देठे, अक्षय राजूरकर, अनिल सातपुते, प्रशांत नागतुरे, वैभव ठाकरे, निलेश बोंडे, संतोष लांजेवार,

सुनील मुजगेवार, संतोष टेंभुर्डे, गौरव काळे, विकास पेंदोर, संतोष रामगीरवार, शुभम भोंगळे, अनिकेत विरुटकर, विशाल पेंदोर, निखिल येकरे, विकास चिडे, प्रवीण खानझोडे, राम मुडे, पवन वर्मा, राजू घाटे, शुभम झाडे, सोहम गौरी, गौरव चीकराम, प्रकाश खोब्रागडे, श्रीनिवास रामटेके, सौरभ कायंदे, राकेश बरशेट्टीवार, निलेश बोढाले, आशिष बोबडे, ललित कायंदे, प्रणय इखारे, सागर बरशेट्टीवार, सोनू आत्राम व समितीचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा:

वणीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेचे आंदोलन

खडकी व खडकडोह येथे प्रतिबंधीत तंबाखूची विक्री करणा-यांवर धाड

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.