प्रवासी वाहनांमुळे शकुंतलाचा धूर लुप्त

गेल्या वीस वर्षांपासून शकुंतला पॅसेंजर बंद

0

रवि ढुमणे, वणी: वणी ते माजरी व वणी ते राजूर यासाठी शकुंतला ही पॅसेंजर गाडी होती. मात्र प्रवासी वाहनांमुळे शकुंतलेचा धूरही दिसेनासा झाला आहे. गेल्या 50 वर्षांपूर्वी राजूर व माजरी जाण्यासाठी शकुंतलाच प्रवाशांच्या सोईसाठी उपलब्ध असायची, आता मात्र ही गाडी गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे.

वणी रेल्वे स्थानकातून गेल्या 50 वर्षांपूर्वी ‘शकुंतला’ ही एकमेव पॅसेंजर राजूर ते माजरी येथे प्रवासी घेवून जायची. कोळशावर चालणारी रेल्वेची ही गाडी दोन डब्ब्यात प्रवासी घेवून जायची. प्रवासी सुध्दा वणी शहरातून कामे करून शकुंतलेची आतुरतेने वाट बघत बसायचे. राजूर येथे ब्रिटीशकालीन कोळसा खाण असल्याने या गावात भारतातील कानाकोप-यातून लोक वास्तव्यास आहेत. खाणीतून काम झाल्यावर कित्येक लोक बाजार करण्यासाठी शहरात येत असत.

तेव्हा येण्यासाठी महामंडळाची बस होती. परंतू त्या बसच्या वेळा निश्चित असल्याने परत जायची समस्या निर्माण व्हायची. दिवसातून दोन वेळा शकुंतला ही पॅसेंजर न चुकता जायची. सोबतच माजरी येथे सुध्दा दोन डब्बे जोडून प्रवासी घेवून निघायची.

खाणीत काम करणारे कित्येक कामगार पायदळ सुध्दा यायचे. कालांतराने काळीपिवळी, अॅटोसारखी प्रवासी वाहने राजूर माजरी येथे सुरू झाली. परिणामी शकुंतलेचे डब्बे रिकामे जायला लागले. गेल्या वीस वर्षांपासून शकुंतला बेपत्ताच झाली. आता तीचा धूर ही दिसेनासा झाला. कोळशावर चालणारी शकुंतला या आधुनिक युगात मात्र गडपच झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.