कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा

प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील लहान पांढरकवडा येथील कोळसा खाणीतून निघालेल्या कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे येथील परिसरातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यावर संबंधित विभागाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी परीसरातील लोक करीत आहे.

लहान पांढरकवडा येथून मागील ६ महिन्यांपासून कोळशाचे उत्खनन करुन रात्रीच्या वेळेस कोळशाची ट्रक टिप्परद्वारे वाहतूक केली जाते. पांढरकवडा (लहान) ते रुइकोट हा राज्यमार्ग नसुन या मार्गावर जिल्हा परिषद अंतर्गत एकेरी डामरीकरण करण्यात आले आहे. पांढरकवडा ते रूईकोट ह्या मार्गाची १० ते १२ टन वाहतूक क्षमत्ता असुन ह्या मार्गावर ३० ते ४० टनचे ओव्हरलोड टिप्पर ट्रक द्वारे वाहतुक केली जाते. त्यामुळे ह्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे.

कंपनीच्या वाहतुकीच्या प्रदुषनाचा शेतीवर परिणाम झाला आहे. शेतातील पिकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. कंपनीकडून ह्या परिसरातील कामगांराना सुध्दा कामावर घेण्यात आले नाही. कंपनीकडून १० किमी परिसरात मागील सहा महिन्यांपासुन आरोग्य शिबिर, वृक्षारोपण असे कार्यक्रमही रावबवण्यात आलेले नाही. आरोग्य, विकास आणि प्रदूषण बाबतीत सर्व नियम धाब्यावर ठेवुन कंपनीकडून जिल्हामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक सुरु आहे.

या गंभीर प्रकाराकडे जिल्हा खनिज अधिकारी, प्रदूषण अधिकारी, वाहतूक अधिकारी व संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-या कंपनी विरूध्द कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.