26 वर्षांनंतर वणीत रंगणार शंकरपटाचा थरार

संजय खाडे यांच्या पुढाकारातून जंगी स्पर्धेचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील जत्रा मैदान येथे मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारीपासून जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते या शंकरपटाचे उद्घाटन होणार आहे. तीन दिवस हा शंकरपट रंगणार आहे. स्व. खा. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या पुढाकारातून या विदर्भ केसरी जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. यात लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आले असून राज्यभरातील सुमारे 150 ते 200 बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

वणी विधानसभा क्षेत्रासाठी गावगाडा शंकरपट
दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. एका गटात पूर्णवाढ झालेली बैलजोडी तर तर दुस-या गटात तरुण (गा-हे) बैलांची जोडी सहभागी होणार आहे. यात नाशिक, पुणे, नागपूर, हिंगोली, जालना, परभणी, जळगाव इत्यादी ठिकाणाहून बैलजोडी येणार आहे. तर वणी विधानसभा क्षेत्रासाठी गावगाडा ही विशेष स्पर्धा राहणार आहेत. यात केवळ वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेतक-यांना सहभागी होता येणार आहे.

अ गटात पहिले बक्षिस 1 लाख 1 हजार, दुसरे 71 हजार, तिसरे 51 हजार रुपये यासह तेरा रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तर क गटात पहिले बक्षिस 41 हजार, दुसरे 31 हजार, तिसरे 21 हजार यासह आणखी तेरा बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. तर गावगाडा स्पर्धेसाठीही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

26 वर्षांनंतर रंगणार थरार – संजय खाडे
शंकरपट ही केवळ बैलांची शर्यत नसून ती आपल्या कृषी संस्कृतीचा एक भाग आहे. गेल्या अनेक शतकांची याला परंपरा आहे. अलिकडे यावरील बंदी उठली. त्यामुळे शेतक-यांची ही परंपरा जपण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वणी 26 वर्षांनंतर प्रथमच ही स्पर्धा रंगणार असल्याने वणी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा थरार अनुभवावा.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राजाभाऊ पाथ्रडकर, जयसिंग गोहोकर, प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, शंकरराव व-हाटे. संजय सपाट, तेजराज बोढे, विवेक मांडवकर, सुनिल वरारकर, प्रशांत गोहोकर, प्रेमानंद धानोरकर, रुपेश ठाकरे, सूर्यकांत खाडे, प्रफुल्ल उपरे, जितेंद्र बोंडे, सतिश खाडे, अमित संते, नितिन खाडे, अनिल भोयर, मनिष खाडे इत्यादींची समिती स्थापन करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती व संजय खाडे मित्र परिवार परिश्रम घेत आहे.

Comments are closed.