शरद पवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

0

बहुगुणी डेस्क, वणी: वणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ७८ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रावादी काँग्रेसतर्फे वणी आणि मारेगाव येथील रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वणीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात सकाळपासूनच रेलचेल सुरू होती. सकाळी 10 वाजता कार्यालयात केक कापण्यात आला. त्यानंतर वणीतील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. त्यानंतर मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावर्षी राज्यात दुष्काळ असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने शरद पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाला फाटा देऊन यावेळी आम्ही फक्त रुग्णांसाठी कार्यक्रम आयोजित केला. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी दिली.

कार्यक्रमात जयसिंग गोहोकर, राजाभाऊ बिलोरिया, महेश पिदूरकर, संगीताताई खटोड, विजयाताई आगबत्तलवार, स्वप्निल धुर्वे, संतोष भोंगळे, सूर्यकांत खाडे, अंकुश मापूर, सिराज सिद्धीकी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.