जब्बार चिनी, वणी: वणी तालुका शिंपी समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व श्री बाल गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर झाले. या प्रसंगी कोरोना या संसर्गजन्य रोगाचा सामना करण्यासाठी समाजातील ज्या मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा, तहसीलदार श्याम धनमने, पंचायत समिती वणीचे सभापती संजय पिंपळशेंडे, सावित्रीबाई फुले दत्तक- पालक समितीचे सचिव गजानन कासावार, केशव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वणी तालुका शिंपी समाज संघटनेचे अध्यक्ष अनिल आक्केवार यांनी केले.
तब्बल 102 वर्षाची परंपरा लाभलेल्या या गणेश मंडळातर्फे सामाजिक भान ठेवून विविध समाजोपयोगी व समाज जागृतीसाठी उपक्रम घेतले जातात. या वर्षी या मंडळातर्फे प्लास्टिक निर्मूलन व्हावे या उद्देशाने कापडी पिशव्या शिवून वाटण्यात आले. या समाजातर्फे शिवण्यात आलेल्या मास्कचे व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कोरोना रोगाच्या काळात कमी पडत असलेला रक्त पुरवठा करण्यासाठी रक्तदान शिबीर घेण्यात आले.
यात 151 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. या कोरोना काळात अधिकारी, पदाधिकारी व स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या नेत्रदिपक कार्याची दखल घेऊन तारेंद्र बोर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, श्याम धनमने, राकेश खुराणा, ठाणेदार वैभव जाधव, गजानन कासावार, प्रशांत भालेराव, डॉ. कमलाकर पोहे, चंद्रशेखर खोंड, डॉ. अमित शेंडे, डॉ. विवेक गोफणे, डॉ. येडमे, अनुज मुक्केवार, डॉ. गिरीश देशपांडे, प्रीतेश आमले, हर्षा आगलावे आशा सेविका अलका कोरपे, प्रतिभा लांजेवार, चंदा पथाडे, अनिता मेश्राम, नंदा वांढरे यांचा शाल श्रीफळ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सूत्रसंचालन केशव नागरी पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार यांनी व आभार संध्याताई रामगिरवार यांनी केले. या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी शिंपी समाज संस्थेचे पदाधिकारी राजेश गटलेवार, कैलास कर्णेवार, संतोष कर्णेवार, नितीन रामगिरवार, पंकज आक्केवार, किरण दिकुंडवार, अरुण वझ्झलवार, प्रज्योत रामगिरवार बाल गणेश मंडळाचे मयूर मेहता, उज्ज्वल चौधरी, वैभव गोखरे, अभिषेक गुंडावार, मोहित पुण्यानी, संकेत भुलगावकर यांनी अथक परीश्रम घेतले.