गडकिल्ल्याची प्रतिकृती ठरत आहे आकर्षणाचे केंद्रबिंदू

जितेंद्र कोठारी, वणी: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार शुक्रवारी दिनांक 10 मार्चला मनसे तर्फे विविध कार्यक्रम घेऊन साजरी केली जाणार आहे. याची तयारी म्हणून यावर्षी शिवतीर्थावर आकर्षक गडकिल्ल्यांच्या देखावा व रोशनाई करण्यात आली आहे. फटाक्याच्या आतिषबाजीसह हा शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

Podar School 2025

सकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक होणार आहे. 21 पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा अभिषेक संपन्न होणार आहे. दुपारी 4 वाजता शहरातून बाईक रॅली निघणार आहे. यात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील युवक सहभागी होणार आहे. शिवतीर्थावर या रॅलीचा समारोप होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केले जाणार आहे. पूजेनंतर चौकात उभारण्यात आलेल्या आकर्षक देखाव्याचे मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतिषबाजीसह जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी विद्युत रोषणाई, लेजर शो प्रमुख आकर्षण राहणार आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसे तर्फे करण्यात आले आहे.

गडकिल्ल्याची प्रतिकृती ठरतये आकर्षणाचे केंद्रबिंदू
शिवजयंतीच्या निमित्ताने शिवतीर्थावर शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ही आकर्षक अशी प्रतिकृती सध्या वणीकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले आहे. सुमारे 5 दिवस अथक परिश्रम घेऊन हा सेट तयार करण्यात आला आहे. या मार्गावरून जाणारी व्यक्ती हा सेट दिसताच थांबल्याशिवाय राहत नाही. या सेटची सध्या शहरात चांगलीच चर्चा रंगत आहे.

Comments are closed.