भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील घोडदरा-शिवनाळा शिवारात गुरुवारी एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. या खून प्रकरणाचे धागेदोरे गवसले असून या प्रकरणी दोन संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही संशयीत फरार झाले आहे. याबाबत मृतकाच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तालुक्यातील अर्जुनी येथील प्रमोद नामदेव रामपुरे (26) या तरुणाचा तालुक्यातील घोडदरा-शिवनाळा शिवारातील धनवे यांच्या शेतात शुक्रवारी मृतदेह आढळून आला होता. मृताच्या अवस्थेवरून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यासंबंधी मारेगाव पोलीस ठाण्यात मृतकाच्या भावाने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत मृतकाच्या भावाने घोडदरा येथील काही लोकांना याविषयी विचारणा केली होती.
याबाबत त्यांना खेकडवाही येथे राहणारे देविदास नाना रामपुरे (28) व सत्यपाल वासुदेव आत्राम (29) या दोघांसोबत मृतक प्रमोद हा घोडदरा येथे पायदळ फिरत होता अशी माहिती मिळाली होती. यावरून मृतकाच्या भावाने दोन्ही संशयीतांनी प्रमोद यास अज्ञात कारणावरून जीवानिशी मारून टाकले अस दाट संशय व्यक्त केला.
मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध भांदविच्या कलम 302, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हे दोन्ही संशयीत सध्या फरार असल्याची माहिती आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पो.उप.निरीक्षक अमोल चौधरी करीत आहे.
हे देखील वाचा:
पोलिसांचे नवीन सुंदर’कांड’, बडग्याच्या कोंबडबाजारासाठी ऍडव्हांस बुकिंग?