मारेगाव येथे बोलरो-दुचाकीचा भीषण अपघात, दोन जखमी

मुख्य रस्त्यावरील घटना, एक गंभीर जखमी

0

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर एका बोलेरो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुपारी 4.45 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. यातील एक जण गंभीर असून जखमी असून दोन्ही जखमींना उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथे एका मयतीसाठी वरोरा तालुक्यातील चिखल वनोजा येथील प्रवीण अशोक पारखी (28) व विठ्ठल रामदास जीवतोडे (46) रा. दहेगाव (कुंभा) हे दोघेही आले होते. अंत्यसंस्कार आटपून हे दोघेही होंडा शाईन (MH34 BQ2765) या दुचाकीने वणी रोडवर असलेल्या पेट्रोल पपंकडे जात होते.

दरम्यान ते दोघेही मारेगाव येथेच असलेल्या एका नातेवाईकाकडे पाणी पिण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या बोलेरो (MH34 K6516) आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. यात दुचाकीचे आणि बोलेरो या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

घटना घडताच लोकांची घटनास्थळावर मोठया प्रमाणावर गर्दी झाली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी असून एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. नागरिकांनी बोलरोच्याच मदतीने जखमींना तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

पोलिसांचे नवीन सुंदर’कांड’, बडग्याच्या कोंबडबाजारासाठी ऍडव्हांस बुकिंग?

Leave A Reply

Your email address will not be published.