एकनिष्ठ राहून पक्षाचं कार्य तळागाळापर्यंत पोहचवा- संजय देरकर

शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल निघाली बाईक रॅली

बहुगुणी डेस्क, वणीः शिवसेना (उबाठा) हा सर्वसामान्यांचा पक्ष पक्ष आहे. सदैव पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचं कार्य तळागाळापर्यंत पोहचवा, असं आवाहन संजय देरकर यांनी केलं. नुकतीच त्यांची पक्षाच्या वणी विधानभा संघटकपदी नियुक्ती झाली. यानिमित्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली. याप्रसंगी ते उपस्थितांशी संवाद साधत होते.
देरकर पुढं म्हणाले की, आपल्या पक्षाचं काम हीच आपली ओळख आहे. सर्वसामान्य माणसाला आजही शिवसेना (उबाठा)चा आधार वाटतो. जनतेचा पक्षावर प्रचंड विश्वास आहे. कार्यकर्त्यांना हा विश्वास टिकवून ठेवावा. अडल्यानडल्यांसाठी सतत झटत राहावं. कुणी मदतीची याचना करण्यापूर्वीच त्याच्यापर्यंत मदत पोहचवण्याचा प्रयत्न करावा. जनसामान्यांचे आशीर्वाद आपल्याला जगण्याचं आणि लढण्याचं बळ देतं. अन्याय, अत्याचाराचा प्रखर सामना करावा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासा. त्यावर प्रत्यक्ष कृती करा.

संजय देरकर यांच्या निवासस्थानाहून बाईक रॅली काढण्यात आली. औपचारिक विधीनंतर बाईक रॅलीला आरंभ झाला. ही रॅली तहसील चौक, बसस्थानकमार्गे साई मंदिराजवळ पोहचली. तिथं संजय देरकर आणि सर्वांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केलं. याच ठिकाणी मयूर खांडरे, विजयसिंग, आकाश गौतम, ओम पेंदोर, मंगेश मडावी, निशीकांत खोकले, राकेश वरारकर, नीलेश सातपुते यांच्यासह असंख्य युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटात संजय देरकर यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केला.


त्यानंतर या बाईक रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला. यावेळी वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर, कामगारनेते अविनाश भुजबळराव, दीपक कोकास, सुधीर थेरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, युवासेना जिल्हा समन्वयक समिर लेनगुरे, संजय देठे, भगवान मोहिते, जगन जुनगरी, मनीष बतरा, अजय चन्ने, चेतन उलमाले, प्रशांत बलकी, चैतन्य टोंगे, अमित घुरकट, कस्तुब येरणे, प्रतिक काकडे, अवि काकडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.