जितेंद्र कोठारी, वणी: जत्रा मैदान रोड वरील एका दुकानदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना आली. रोशन दिगंबर बावने (21) असे मृतकाचे नाव आहे. तो अविवाहित होता व तो लालगुडा येथील रहिवासी होता. दरम्यान या प्रकरणी रोशनच्या नावाने असलेली एक सुसाईड नोट व्हायरल होत आहे. यात माझे प्रेम सिद्ध करण्यासाठी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे प्रेमभंगातून तर आत्महत्या झाली नसावी? या चर्चेला उधाण आले आहे.
रोशन याचे शहरातील जत्रा मैदान रोडवरील हनुमान मंदिरासमोर टिनाच्या शेडमध्ये छोटेसे दुकान होते. या दुकानातून तो लाकडी वस्तूंची विक्री व दुरुस्तीचे काम करायचा. हा भाग शहराबाहेर असल्याने शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने अनेक दुकान मालक किंवा दुकानातील कारागिर दुकानातच झोपतात.
मंगळवारी दिनांक 11 जुलै रोजी रात्री दुकान बंद करून रोशन हा दुकानात झोपला होता. तर दुकानाबाहेर दुकानातील कारागिर झोपला. सकाळच्या सुमारास कारागिर पाणी पिण्यासाठी दुकानात गेला असता त्याला आत रोशनने गळफास घेतल्याचे आढळले. त्याने याची माहिती तात्काळ रोशनच्या वडिलांना दिली.
व्हायरल झालेली सुसाईड नोट रोशनची?
मृत्यूपूर्वी रोशनने सुसाईट नोट पाठवल्याची चर्चा संध्या रंगत आहे. या सुसाईड नोटमध्ये ज्या मुलीवर जिवापाड प्रेम केले तिच मुलगी वैरी बनली आहे. मला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे विचार रोज माझ्या मनात येतात. अपघात होऊन रोज मरण्याचा विचार येण्यापेक्षा मीच स्वत:च आयुष्य संपवत आहे. आज पर्यंत दारूला स्पर्श सुद्धा केला नाही. मात्र आज मी दारू पिली असून माझे प्रेम सिद्ध करण्यासाठी मी आत्महत्या करीत आहे. अशा आषयाची ही सुसाईड नोट आहे. ही नोट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. ही सुसाईड नोट खरी की खोटी याची चौकशी होणे गरजेचे आहे.
रोशनने आत्महत्या केल्याचे कळताच लालगुडा व परिसरातील अनेक लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. रोशनच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.
Comments are closed.