सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मांडवी या गावातील सिकलसेल रुग्ण संदीप सुरपाम यांना तज्ज्ञ डॉक्टर नसल्याचा फटका बसला. त्यांच्यासह अनेकांना त्यामुळे धडपड करावी लागत आहे. त्यामुले त्यांनी गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे सिकल्सेल संबधित माहिती देणारे डॉक्टर नसल्याची तक्रार दाखल केली.
झरी तालुक्यात सिकलसेल तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने वारंवार यवतमाळ येथे उपचारा साठी जावे लागते. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने यवमाळमधील दवाखान्यात जाणे व परवडणारे नसल्याने अशा सिकलसेल रुग्णाला अती संकटाचा सामना करावा लागत आहे. वेळेवर उपचार व्हावा, गोळ्या,ओषधी, रक्त मिळावे यासाठी तालुक्यात या रुग्णाची सोय, उपचार व्हावा अशी मागणी घेऊन मांडवी येथील संदीप सुरपाम यांनी तक्रार केली.
एका महिन्यात तज्ज्ञ डॉक्टर न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विद्यार्थी बिरसा बिग्रेड यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख संदीप दीपक सुरपाम यांनी दिला…
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)