महागाई विरोधात युवक काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान
इंधन दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधाक काँग्रेस आक्रमक
सुशील ओझा, झरी: देशभरात पेट्रोल, डिझेल व गॅससह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. याचा परिणाम इतर व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे अनेक वस्तू चे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोना मुळे आधीच अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे सामान्य जनतेला जगणे कठीण होत चालले आहे. केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करित आहे.
काँग्रेसच्या वतीने आता पर्यंत अनेक आंदोलने करण्यात आले. तरीही झोपलेल्या केंद्र सरकारला जाग आली नाही. त्यामुळे केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासोबतच सरकारचे लक्ष वेधून ही भाववाढ कमी करण्यात यावी, या करिता झरी तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वाक्षरी अभियान राबवून राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात येणार आहे.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे संदीप बुरेवार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती झरी तथा सरपंच ग्रा प टाकळी, निलेश येल्टीवार सरपंच ग्रा प दिग्रस तथा अध्यक्ष सरपंच महासंघ झरी तालुका, राहुल धांडेकर अध्यक्ष युवक काँग्रेस झरी, प्रताप तोटावार अध्यक्ष वणी विधानसभा युवक काँग्रेस, सचिन टाले उपाध्यक्ष वणी विधानसभा युवक काँग्रेस,
भागवान चुक्कलवार सामाजिक कार्यकर्ते , संतोष कोहळे, नितीन खडसे, सुरज मेश्राम, गणेश कुडमेथे, प्रतीक गंडरतवार, प्रणय दर्शनवार, प्रज्योत येणपोतुलवार, साई अप्पसवार, वेणू येणपोतुलवार, मनोज अडपावार, प्रशांत यादनवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा: