पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सिंधी कॉलोनी येथील रहिवाशी असलेले व व्यावसायिक राजेश नागदेव यांचा मुलगा रोहन नागदेव यांनी एमबीबीएस ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याच्या या यशाबाबत सर्वत्र कौतुक केले जात आहे. रोहनने प्राथमिक शिक्षण वरोरा येथून घेतले. त्यानंतर त्याने शहरातील स्वर्णलीला या शाळेतून पुढील शिक्षण पूर्ण केले. 12 वी नंतर 2017 मध्ये रोहनने एमबीबीएससाठी अमरावतील येथील डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज येथे प्रवेश घेतला. नुकताच एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचा निकाल आला असून यात रोहन यशस्वी होत डॉक्टर झाला आहे. रोहन आपल्या यशाचे श्रेय वडील राजेश नागदेव, आई सरला नागदेव, मोठे वडील भागचंद नागदेव, उषादेवी नागदेव, टोनी धामेंचा, दिलिप धामेंचा यांच्यासह शिक्षक व नागदेव कुटुंबीयांना देतो. रोहनच्या यशाबाबत परिसरात आनंद व्यक्त केला जात असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.