स्माईल फाउंडेशचे वणीमध्ये वृक्षारोपण

एस. पी. एम. हायस्कूलजवळ झाडे लावलीत

0

विवेक तोटेवार, वणी: स्माईल फाउंडेशनने एस. पी. एम. हायस्कूलजवळ झाडे लावलीत. यावेळी एकूण 11 लिंबाची झाडे ट्री गार्ड सोबत लावण्यात आलीत. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव लक्ष्मण भेदी आणि वणी पोलिस स्टेशन चे एपीआय निखिल फटिंग तसेच दिलीप कोरपेनवर, स्माईल फाऊंडेशनचे संस्थापक सागर जाधव, विनम्र कुईटे, आकाश लेडांगे, गणेश गोहोकार, निखिल मुत्तलवार, कपिल राऊत, सचिन जाधव व सदस्य उपस्थित होते

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

फाउंडेशनचा वृक्षारोपणाचा हा दुसरा उपक्रम आहे. या अगोदर ग्राऊंडच्या आतमध्ये व बाहेर एकूण 14 झाडे लावण्यात आली होती. आतापर्यंत फाउंडेशनतर्फे एकूण 44 झाले लावण्यात आलेली आहेत. या सर्व झाडांना ट्री गार्डचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्माईल फाउंडेशन ही एक एनजीओ असून शिक्षण, आरोग्य व पर्यावरण इत्यादी क्षेत्रांमध्ये काम करीत असते.

Leave A Reply

Your email address will not be published.