दहावीचा निकाल जाहीर.. पुन्हा मुलीच अव्वल

जनता विद्यालय वणीची अंजली बलकी तालुक्यात प्रथम तर मयूर वाढई द्वितीय

जितेंद्र कोठारी, वणी : राज्य बोर्डाचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. अमरावती विभाग अंतर्गत जनता विद्यालय वणीची अंजली वामन बलकी या विद्यार्थिनीने 94.80 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच याच विद्यालयाचे विद्यार्थी मयूर अनिल वाढई यांनी 94.60 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळविला.

वणी तालुक्यातील वणी, पुनवट, घोंसा, उकणी, कुरई, साखरा (को.), नेरड, शिरपूर, वेळाबाई, नांदेपेरा, राजूर (का.), कायर, सावर्ला, शिंदोला, साखरा (दरा), पेटूर, भालर, ब्राह्मणी, मारेगाव (को.), परमडोह, मंदर, कळमना, तेजापूर, मोहोर्ली, मेंढोली, बोर्डा, वांजरी, चिखलगाव, मूर्धोनी, नायगांव, परसोडा येथील 43 शाळांमधील 2356 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी 2182 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

शासकीय माध्यमिक विद्यालय वणी, नवभारत हायस्कूल उकणी, लॉयन्स इंग्लिश मिडीयम स्कुल वणी, श्रीमती नुसाबाई चोपणे विद्यालय वणी, आदर्श हायस्कुल साखरा (दरा), तुकडोजी महाराज हायस्कूल भालर, मल्टीपरपज ग्रामीण विकास विद्यालय ब्राह्मणी, ग्रामीण विद्यालय परमडोह, स्व. विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर, सरस्वती माध्यमिक विद्यालय मोहोर्ली, वणी पब्लिक स्कुल वणी, साईकृपा माध्य. विद्यालय मूर्धोनी, राजकीय अनु. जाती मुलांची निवासी शाळा परसोडा, संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल वणी आणि न्युव्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल वणी या 15 शाळांचा 100 टक्का निकाल लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.