SSC निकाल: क्षितिज बोंडे मारेगाव तालुक्यात प्रथम

विदयानिकेतन व मोघे शाळेचा निकाल 100%

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आज दहावीचा निकाल ऑनलाईन लागला असून यात मारेगाव तालुक्याचा निकाल 93.53% लागला आहे. यामध्ये विधानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल मारेगाव व लक्ष्मीबाई मोघे विधालय जळका शाळेचा निकाल 100% लागला आहे. विद्यानिकेतनचा क्षितिज गजानन बोंडे हा विद्यार्थी 96.40% टक्के गुण घेऊन तालुक्यातुन अव्वल आला आहे. तर फैजा शिबा शेख अहमद ही विद्यार्थीनीने 94.60% टक्के गुण घेऊन तालुक्यातुन दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर क्षितिज भारत मत्ते 94% गुण घेऊन तालुक्यात तिसरा आला आहे.

संत गजानन विद्यालय नरसाळा 93.75%, आदर्श हायस्कुल मारेगाव 96.74% , राष्ट्रीय विद्यालय मारेगांव 90 .51%, विद्यानिकेतन मारेगाव 100%, पंचशिल नवरगाव 97 .82%, आदर्श हायस्कुल मार्डी 87 .23% , चोपने विद्यालय बोटोणी 96 .55%, कन्या विद्यालय मारेगाव 95 .83%, भारत विद्यामंदीर कुंभा 94. 31%, जगन्नाथ महाराज विद्यालय वेगाव 88.88%, राष्ट्रीय विद्यालय हिवरा 92.67%, पोस्ट बेसीक आश्रम शाळा बोटोणी 97.22%, दर्शन भारती विद्यालय गोंडबुरांडा 95.45% निकाल लागला आहे.

लक्ष्मीबाई मोघे विद्यालय जळका 100% , महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय मारेगाव 77.77%, केबीपी विद्यालय चिंचमंडळ 96.87%, नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमीक विद्यालय म्हैसदोडका 93.10% , युगांतर आदिवासी आश्रमशाळा कान्हाळगाव 80% , गिरजाबाई विद्यालय पिसगाव 83.33, संकेत माध्यमिक विद्यालय मारेगाव 96.29%, जीवन विकास विद्यालय हटवांजरी 97.14% , संकेत माध्यमीक विद्यालय गौराळा 92.59%, पुरके आश्रम शाळा मारेगाव 96.53% लागला असून तालुक्याचा निकाल 93.53% लागला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.