संपामुळे 3 दिवसांपासून वणी डेपोत ‘लॉकडाउन’
40 एसटी बसेस डेपोमध्येच चक्काजाम.... दिवाळीला गावी आलेल्या प्रवाशांचे हाल
जितेंद्र कोठारी, वणी: एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. 31 ऑक्टोबर पासून सुरु आंदोलनामुळे ऐन दिवाळीत गावी परत आलेल्या प्रवाशांचे यामुळे हाल होत आहे. दिवाळीनंतर विशेषतः भाऊबीजेनंतर आपल्या घरी जाणाऱ्या भावा-बहिणींचे मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे. 8 नोव्हेंबर पासून संप अधिक तीव्र करण्यात आले आहे. त्यामुळे मागील 3 दिवसांपासून वणी डेपोमधून एकही बस सुटली नाही.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे. एसटी कामगारांना राज्य शासन कर्मचाऱ्यासारखे वेतन व सोयीसुविधा मिळावी. या मागणीला वणी आगारातील कामगार मागील 31 ऑक्टोबर पासून संप करीत आहे. वणी एसटी आगारात एकूण 244 चालक, वाहक, प्रशासकीय व कार्यशाळा कामगार आहे. त्यापैकी 92 चालक, 56 वाहक, 9 प्रशासकीय कर्मचारी व 20 कार्यशाळा कामगार संपात सहभागी झाले आहे. डेपोमधील 40 एसटी बसेज मागील 3 दिवसांपासून चक्काजाम असून वणी बस स्थानकावरून एकही बस सोडण्यात आली नाही.
एसटी कामगारांच्या संपामुळे शहरी व ग्रामीण भागातील प्रवाश्यांचे हाल झाले आहे. विशेषतः भाऊबीजेनंतर आपल्या घरी जाणाऱ्या भावा-बहिणींचे मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे. राज्य सरकार जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करीत नाही तोपर्यंत संप सुरु राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते कामगारांनी दिली.
लवकर तोडगा निघावा – डेपो मॅनेजर
वणी बस डेपोमधील बहुतांश कामगार संपात सहभागी झाल्यामुळे 8 नोव्हे. पासून सर्व बसेज डेपोमध्ये उभ्या करण्यात आली आहे. एसटी कामगार नेते व राज्य शासनामध्ये चर्चा सुरू असून लवकरच तोडगा निघेल. आम्ही जनतेला चांगली सेवा देण्यास तत्पर आहोत.
सुमेध टिपले: आगार प्रमुख वणी
हे देखील वाचा:
Comments are closed.