मुकुटबन येथे खासगी कापूस खरेदीला सुरूवात

पहिल्या दिवशी 4 हजार 650 रुपये निघाला भाव

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील बालाजी जिनिंगमध्ये दस-याच्या शुभ मुहुर्तावर खासगी कापसाची खरेदी सुरू करण्यात आली. शुभारंभ भाव हा 4 हजार 650 रुपये निघाला. पहिल्या दिवशी सुमारे दीड हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.

पहिल्या दिवशी सकाळी 11 वाजता सभापती व संचालक यांच्या हस्ते कटापूजन करण्यात आले. त्यानंतर 11 टेम्पो व 6 बैलगाडी घेऊन येणाऱ्या 11 शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पहिल्या दिवशी 4 हजार 650 रुपये भाव काढण्यात आला. कापूस विक्री करिता 49 बैलगाड्या व 76 टेम्पो आले व 1 हजार 403 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली.

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टेम्पो व बैलगाड्या आणल्यामुळे बाजार समितीला मोठ्या प्रमाणात धावपळ होती. कोणताही गोंधळ न होता सर्व काम सुरळीत पार पडले. आज दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 ऑक्टोबरला 4 हजार 700 रुपये कापसाचा भाव काढण्यात आला.

कापूस खरेदी व शेतकऱ्यांचे सत्कार सभापती संदिप बुरेवार उपसभापती संदीप विंचू, सचिव रमेश येल्टीवार, संचालक सुनील ढाले, गजानन मांडवकर, विजय पानगंटीवार, शंकर पाचभाई व बापूराव जिंनावार यांच्या हस्ते करण्यात आले.

शेतक-यांची लूट होणार नाही याची काळजी घ्या
तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकुटबन कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सभापती संदीप बुरेवार उपसभापती संदीप विचू सचिव रमेश येल्टीवार संचालक तथा बांधकाम सभापती सुनील ढाले, राजू आस्वले यांनी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कापसाचा वजनकाटा केल्याशिवाय गा़डी जिनिंगमध्ये खाली करू नये अशी सूचना केली होती. शिवाय शेतक-यांची लूट होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा दलालीचा परवाना रद्द करण्यात येईल असा इशाराही दिला होता. याच अनुषंगाने ही कापूस खरेदी सुरू करण्यात आली.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.