लालगुडा, शिरपूर येथे ‘विद्यार्थी दिन’ संपन्न
वणी: न्यू गॅलेक्सी कॉन्व्हेंट लालगुडा येथे नुकताच विद्यार्थी दिन संपन्न झाला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून परिवर्तन शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक विजय रामटेके तर प्रमुख उपस्थिती अँड सूरज महारतळे यांची होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विविध भाषणे दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय रामटेके म्हणाले की ‘बाबासाहेबांच्याच नावाने हा विद्यार्थी दिन का साजरा व्हावा?’, याचा प्रत्येक सुशिक्षिताने विचार करावा. तर अँड सूरज महारतळे म्हणाले कि, प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेबांचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन शिक्षण घ्यावे व त्या शिक्षणाचा उपयोग केवळ आपल्या कुटूंबाकरिता न करता समाजासाठी, देशासाठी करावा. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सुषमा खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.शीतल उईके यांनी केले
शिरपूर येथे विद्यार्थी दिन
शिरपुर येथील श्री गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा.विजय करमनकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सीमा सोनटक्के, प्रा. गणेश लोहे, प्रा. रूपेश धुर्वे व प्रा. वासुदेव ठाकरे हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. करमनकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवला. प्रा.लोहे व प्रा.धुर्वे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमधुन कु. शीतल अविनाश बोधे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा प्रवास आपल्या भाषणातून उलगडून दाखविला. प्रा.श्री. सुधीर वटे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर प्रा. श्री ठाकरे सरांनी आभार मानले.